योजनेचा प्रकार :
राज्य शासन
माहिती :
योजनेचा उदेश:: गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकते नुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल पुरविण्याची योजना आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:: अंध, अंशत:अंध, अस्थिव्यंग,कर्णबधिर
योजनेच्या प्रमुख अटी
विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दरमहा रु 1500/- पेक्षा कमी असावे. रु 1501/- ते 2000/- पर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सदर साधनाची अर्धी रक्कम भरावी लागेल.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप:: या योजनेत अस्थिव्यंग अपंगांसाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवण यंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3000/- पर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.
अर्ज करण्याची पध्दत:: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
योजनेची वर्गवारी:: अपंगांना सहाय्य
संपर्क कार्यालयाचे नाव:: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare
View