दिव्यांग मित्र अभियान

विविध योजनांची माहिती

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे ::अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग.

योजनेच्या प्रमुख अटी ::
विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :: अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत :: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/obc-about-us-mr

Download
स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: 6 ते18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्थंामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगंाच्या विविध शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद मुलांना शिक्षण व निवासाची विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळांमधून दिले जाते

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:: अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मतिमंद

योजनेच्या प्रमुख अटी:: विहीत नमुन्यात संबंधीत शाळा/कर्मशाळा यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप: अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत:: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: स्वयंसेवी संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग कल्याण राज्य पुरस्कार

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी / स्वयं उद्योजक आणि नियुक्तक संस्था यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यांत येते.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :: अंध,अस्थिव्यंग,मतिमंद,कर्णबधिर

योजनेच्या प्रमुख अटी :: विहीत नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप ::
१.उत्कृष्ठ अपंग कर्मचारी व अपंग स्वयंउद्योजक - रोख पुरस्कार रूपये 10,000/- शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र (पुरस्कारांची संख्या-१२)
२.अपंगाचे नियुक्तक- रुपये 25000/- रोख व मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र (पुरस्कारांची संख्या-२)

अर्ज करण्याची पध्दत:: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी:: सामाजिक सुधारणा

संपर्क कार्यालयाचे नाव :: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश:: गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकते नुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल पुरविण्याची योजना आहे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:: अंध, अंशत:अंध, अस्थिव्यंग,कर्णबधिर

योजनेच्या प्रमुख अटी
विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दरमहा रु 1500/- पेक्षा कमी असावे. रु 1501/- ते 2000/- पर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सदर साधनाची अर्धी रक्कम भरावी लागेल.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप:: या योजनेत अस्थिव्यंग अपंगांसाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवण यंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3000/- पर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.

अर्ज करण्याची पध्दत:: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी:: अपंगांना सहाय्य

संपर्क कार्यालयाचे नाव:: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: व्यवसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अपंगांना त्यांचा स्वत: व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेत अपंग व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:: अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग

योजनेच्या प्रमुख अटी
विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.
सरकार मान्य संस्थेतून व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण झालेला दाखला अर्जासोबत जोडावा.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
धंदयासाठी लागणाऱ्या साधनांची यादी व त्यांची अंदाजित किंमत लिहून अर्जासोबत जोडावी.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :: अपंग व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.

अर्ज करण्याची पध्दत:: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: अपंगांना रोजगार निर्मिती

संपर्क कार्यालयाचे नाव:: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: राज्यातील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमाकांच्या प्रत्येकी तीन अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :: अंध, मुकबधिर, स्पास्टीक / अस्थिव्यंग

योजनेच्या प्रमुख अटी :: राज्यातील इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षांमध्ये विभागीय परिक्षा मंडळामधून प्रत्येक विभाग निहाय गुणवत्ता यादीप्रमाणे अधिक गुण मिळालेले असले पाहिजे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :: विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमाकांच्या प्रत्येकी तीन अपंग विद्यार्थ्यांना रूपये 1000/- रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

अर्ज करण्याची पध्दत :: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण विभाग.

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: बालहक्क (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 व सुधारीत नियम 2006 अन्वये अनाथ मतिमंद बालकांसाठी एकूण 19 विशेष बालगृहे स्वयंसेवी संस्थाकडून चालविली जात असून त्यापैकी १४ मतिमंद बालगृह़े अनुदानित असून 5 विनाअनुदानीत स्वरुपाची आहेत.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :: मतिमंद

योजनेच्या प्रमुख अटी ::
विहीत नमुन्यात बाल कल्याण समिती यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे व तो अनाथ असावा.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :: या बालगृहामधील प्रवेशितांना अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळा तसेच वसतिगृहांना असलेल्या निकषानुसारच देखभाल व निर्वाहासाठी अनुदान देण्यात येत असून शैक्षणिक,आरोग्यविषयक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची पध्दत :: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: संबंधीत जिल्हयाची बाल कल्याण समिती.

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उद्देश :: वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेल्या महिला वृध्द, निराश्रित, अपंग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृध्दाश्रमासाठी अनुदान देणे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव :: सर्व प्रवर्गातील वृध्दांसाठी.

योजनेच्या प्रमुख अटी:: लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
निराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष असावे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप :: अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता शासनाकडून रु. 900/- दरमहा परिरक्षण अनुदान देण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत :: संबंधीत वृध्दाश्रमाकडे व अनुदानित संस्थेकडे, तसेच संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.

योजनेची वर्गवारी :: विशेष सहाय्य

संपर्क कार्यालयाचे नांव :: संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण मुक्त अपंग विदयार्थी

योजनेच्या प्रमुख अटी ::
इ.10 वी पुढील सर्व पदव्युत्तर सनद अभ्यासक्रम पदविका प्रमाणपत्र, तांत्रिक, औद्योगिक व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा अपंग विद्यार्थी असावा.
मागील वर्षी परिक्षेत नापास झालेला नसावा
अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के व त्यापेक्षा जास्त असावे, अपंगत्वाचा दाखला वैद्यकीय मंडळाकडील असावा.
उत्पन्नाची अट नाही

अर्ज करण्याची पध्दत :: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उदेश :: अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण मुक्त अपंग विदयार्थी

योजनेच्या प्रमुख अटी ::
लाभार्थी इ.1 ली ते 10 वी पर्यंत कोणत्याही इयत्तेमध्ये शिकणारा असावा. तसेच एका वर्गात एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा.
अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के व त्यापेक्षा जास्त असावे, अपंगत्वाचा दाखला वैद्यकीय मंडळाकडील असावा.
उत्पन्नाची अट नाही

अर्ज करण्याची पध्दत :: विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

योजनेची वर्गवारी :: शैक्षणिक

संपर्क कार्यालयाचे नाव :: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उददेश :: राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :: सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी:: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप :: प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत :: अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो

योजनेची वर्गवारी :: निवृत्तीवेतन

संपर्क कार्यालयाचे नाव :: जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download
मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना

योजनेचा प्रकार : राज्य शासन

संक्षिप्त माहिती : योजनेचा उद्देश :: राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अपंगाच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे. :: अपंग प्रवर्गासाठी

योजनेच्या प्रमुख अटी :: लाभार्थी किमान 40 % अपंग असलेला असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्या अर्जदारास ज्ञान किंवा अनुभव असावा.

अर्ज करण्याची पद्धत :: अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

अर्ज करण्याची पद्धत :: राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते जिल्हा कार्यालयात प्रत्यक्षरित्या कर्जाच्या ऑनलाईन अर्जाची विक्री व कर्ज वितरण करण्यात येत. अशा पध्दतीने कर्ज स्विकृती व मंजूरी बाबतची कार्यवाही सुरू आहे.

योजनेची वर्गवारी:: सदर महामंडळामार्फत अपंग व्यक्तींना
शैक्षणिक कर्ज
स्वयंरोजगारासाठी आणि
आर्थिक उन्नती साठी कर्ज देण्यात येते.

संपर्क कार्यालयाचे नाव व दूरध्वनी क्रमांक :: महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, वांद्रे, मुंबई - ५१
दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २६५९१६२०/२२ फेक्स ०२२ - २६५९१६२१

संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

Download

कॉपीराईट © 2018 जिल्हा परिषद, सांगली, सर्व हक्क राखीव.